Ad will apear here
Next
रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी २५ ऑगस्टला निबंध स्पर्धा
रत्नागिरी : ग्राहक प्रबोधनाच्या हेतूने रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावी या दोन गटांत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५  ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत फाटक हायस्कूल येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन निबंध लिहायचा आहे. त्या वेळी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. माझे गाव-स्वच्छ गाव, स्वच्छता अभियानात मी.. हे विषय आठवी ते दहावीच्या गटासाठी आहेत. मोबाइल - मित्र, शत्रू की आणखी काही?, डॉक्टर-रुग्ण नाते की डॉक्टर ग्राहक? हे विषय अकरावी, बारावीच्या गटासाठी आहेत. स्पर्धेसाठी शब्दमर्यादा नाही; मात्र कालमर्यादा एक तास आहे.

प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना ७०० रुपये, ५०० व ३०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी प्रतिभा प्रभुदेसाई (९५४५५ ०६२५३) आणि विनय परांजपे (९९२२२ ६०६४१) यांचयाशी संपर्क साधावा. व्हॉट्सअॅपवर नावनोंदणी करताना शाळेचे नाव, स्पर्धकाचे नाव व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. सर्व शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भाग घेण्यात प्रोत्साहित करावे, तसेच प्रशालेत ग्राहक प्रबोधनाचा एखादा कार्यक्रमही आयोजित करावा, असे आवाहन ग्राहक शिक्षण विभागाने केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZVBCD
Similar Posts
ज्ञानाची ऊर्जा देणाऱ्या शाळेला विद्यार्थ्यांकडून सौर ऊर्जेची पॅनेल्स रत्नागिरी : ज्या शाळेने आपल्याला ज्ञानाची ऊर्जा दिली आणि सर्वार्थाने स्वयंपूर्ण होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले, त्या शाळेला ‘ऊर्जे’त स्वयंपूर्ण करून विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधून १९९४मध्ये दहावी होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी
जे क्षेत्र निवडाल, त्यात सर्वोत्तम काम करा रत्नागिरी : ‘समाजात प्रत्येक क्षेत्रातील कुशल व्यक्तींची गरज आहे. त्यामुळे केवळ डॉक्टर, वकील, इंजिनीअर होणे, म्हणजेच कोणी मोठे होणे असे नव्हे. कोणतेही क्षेत्र निवडा; पण जे निवडाल, त्यात सर्वोत्तम काम करा,’ असा कानमंत्र न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न’ रत्नागिरी : ‘आज मी कॅलिफोर्नियात एका नामवंत कंपनीत नोकरीला आहे; मात्र त्याचे श्रेय माझ्या शाळेने केलेल्या संस्कारांमुळे झालेल्या जडणघडणीला आहे. त्यामुळेच मी आज इथे येऊन पोहोचले आहे. म्हणूनच शाळेच्या या ऋणातून उतराई होण्याकरिता छोटेसे योगदान असावे, असे मनात आले. त्यामुळेच मी शाळेला देणगी दिली. सामाजिक
डॉक्टर रुग्ण संबंधांवर रत्नागिरीत व्याख्यान रत्नागिरी : येथील ग्राहक पंचायतीतर्फे ‘सर्वांसाठी आरोग्य आणि डॉक्टर रुग्ण संबंध’ या विषयावर पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता झाडगाव नाका येथील माधवराव मुळ्ये भवन येथे होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language